सोलापुरात नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आदेश…..

सध्या सेतू कार्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना ई सेवा केंद्रावरच अवलंबून रहावे लागत आहे. तर विविध तालुक्यात जवळपास १ हजार ३०० ई महासेवा केंद्राची संख्या आहे. सर्व ई सेवा केंद्रे आजपासून सुटीच्या दिवशीही सुरु ठेवण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, रहिवाशी दाखले, गॅप प्रमाणपत्र, उत्पन्न दाखल्याची गरज असते. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ते सहजासहजी उपलब्ध व्हावे, यासाठी महा ई सेवा केंद्रांना आता सावध राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यात जूनमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विविध शाखेला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असते.या पार्श्वभूमीवर दाखल्याऐवजी अथवा काही कागदपत्रा ऐवजी त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जवळपास १ हजार ३०० ई सेवा आणि महा ई सेवा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या सेतू कार्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना ई सेवा केंद्रावरच अवलंबून रहावे लागत आहे. तर विविध तालुक्यात जवळपास १ हजार ३०० ई महासेवा केंद्राची संख्या आहे. ही सर्व ई सेवा केंद्रे आजपासून सुटीच्या दिवशीही सुरु ठेवण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिल्या आहेत.विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, रहिवाशी दाखले, गॅप प्रमाणपत्र, उत्पन्न दाखल्याची गरज असते. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ते सहजासहजी उपलब्ध व्हावे, यासाठी महा ई सेवा केंद्रांना आता सावध राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.