२२ जानेवारीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी श्री रामांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त अयोध्या येथे एकूण ४० विविध ठिकाणी भंडाऱ्याचे (महाप्रसाद) आयोजन केले जाणार आहे. वासाठी संपूर्ण भारतातून अनेक संस्थांचे आवेदन ट्रस्टकडे आले आहेत. सोलापुरातील ८० भगिनी या महाप्रसाद बनविण्याच्या सेवेत सहभागी होणार आहे.
सोलापुरातील सीए राजगोपाल मिणियार हे अयोध्येच्या सल्लागार समितीत आहेत. त्यांनी संकल्प करून आग्रहाने सोलापूर जिल्ह्यासाठी एक भंडारा आरक्षित केला. भंडारा समस्त हिंदू समाज, सोलापूर जिल्ह्यातर्फे चालवणार आहे. भंडाऱ्यात दररोज स्वयंपाक करण्यासाठी सोलापुरातील उद्योगवर्धिनीमार्फत चंद्रिकाबेन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ८० महिला वा २०-२० महिलांच्या तुकडीमध्ये जाऊन हा प्रसाद बनवणार आहेत.
या महिलांना जाण्या-येण्याचा खर्च व दैनिक मानधनदेखील दिले जाणार आहे. तेथे स्वयंसेवक म्हणून अनेक हिंदू संघटनांतील सभासद रंगनाथ बंकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली १५-१५ तुकडीमध्ये एकूण शंभर सभासद स्वखर्चाने येणार आहेत.