विट्यात बॅटरीवर चालणाऱ्या कृत्रिम हात बसविण्याच्या शिबिर….

विट्यात पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या येथील विश्वात्मा सोशल असोसिएशन व पुणेच्या इनाली फाउंडेशनच्या वतीने ज्यांचे हात कोपरापासून निकामी झाले आहेत, अशा ५५ दिव्यांगांना बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात मोफत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. या दोन्ही फाउंडेशनच्या या उपक्रमांमुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.विटा येथे विश्वात्मा सोशल असोसिएशन व इनाली फाउंडेशन या सामाजिक संस्थांच्या वतीने दिव्यांगांसाठी बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात मोफत बसविण्याचे शिबिर आयोजित केले होते.

या शिबिरात ज्यांचे हात कोपरापासून निकामी झाले आहे .अशा ५५ दिव्यांगांना बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात मोफत देण्यात आले. सहभागी झालेल्या दिव्यांगांची निवड करून तातडीने ४८ जणांना कृत्रिम हात बसविण्यात आले. यावेळी ७ दिव्यांगांचे कास्टिंग घेऊन त्यांना हात बनवून दिले जाणार आहेत.