विटा- म्हैसाळ रस्ता वाहतुकीस अरुंद आहे. अरुंद रस्त्यावरील वाहतूककोंडी फोडून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विटा – म्हैसाळ रस्त्याचे फोर लेन सिमेंट काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी दलित महसंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता मुधाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विटा ते म्हैसाळ रस्ता ६५ लांबीचा किमीचा असून तो अरुंद आहे. या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे; परंतु रस्ता मात्र अरुंदच आहे. खड्ड्यांवर दुरुस्तीच्या नावाखाली प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्ची पडत आहेत. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना गरजेची आहे. तेव्हा विटा-म्हैसाळ रस्त्याचे फोर लेन काँक्रीटीकरण करावे, असे निवेदनात केदार यांनी म्हटले आहे.