आज ‘आयपीएल’चा अंतिम सामना!

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात जेतेपदासाठी सामना होईल. चेन्नईतील चेपॉक मैदानावर हा सामना रंगेल.आयपीएलच्या 17 व्या पर्वाचा विजेता कोण हे आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर ठरणार आहे. एमए. चिदंबरम स्टेडियममध्ये मॅच होणार आहे. दोन्ही टीम आपआपल्या बेस्ट खेळाडूंसह मैदानात उतरतील.