आटपाडी बसस्थानकामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठवून ठेवले आहेत. स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय दयनीय आहे. परिणामी महिलांची गैरसोय होत असल्याने महिला प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे, तर अनेक समस्यांच्या विळख्यात आटपाडी बसस्थानक अडकले सध्या बसस्थानक परिसरातील स्वच्छतेचे काम एका खासगी एजन्सीला दिले आहे. त्यांच्याकडून काही चुका होत असल्यास त्यांना सक्त सूचना देतील व बसस्थानक परिवार स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आगारप्रमुख आटपाडी असून, नेतेमंडळींनी याकडे लक्ष घालून अद्ययावत बसस्थानक निर्माण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.आटपाडी बसस्थानकात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. फलाटांवरही नेहमी कचरा पसरलेला असतो.बसस्थानक परिसरात कचरा साठला आहे. प्रवाशांसाठी असणारे शौचालय अपुरे आहेत. पाणी निचरा होण्याची कोणती सोय नाही चालक वाहक इमारत सध्या चांगली आहे. मात्र स्वछता केली जात नसल्याने संपूर्ण बसस्थानकात साठला आहे.