पंचगंगा नदी प्रदूषित घटकावर कारवाईचे आदेश…

पंचगगा नदी प्रदूषण प्रश्नी उशिरा का होईना पण आज महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आली. विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या असणारे कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेचे अधिकारीच या बैठकीस उपस्थित होते.नदी प्रदूषणास कारणीभूत घटकांवर दीर्घकालीन आणि तात्कालीक उपायोजना करण्याच्या नेहमीप्रमाणे सूचना करून बैठकीची सांगता करण्यात आली.

पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नदीचे पाणी काळसर दुर्गंधीयुक्त होऊन मासे मृत्युमुखी पडले. सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकांना करणे दाखवा नोटीस बजावण्याची नेहमीचीच कारवाई केली.यानंतर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक झाली.

नदी प्रदूषण प्रश्नी नोटीस बजावलेले कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. दोन्ही महापालिकांना सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी एस. कार्तीकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पुणे विभाग नगरपालिका प्रशासन उपायुक्त दत्तात्रय लाघी, जिल्हा नगर प्रशासन सहाआयुक्त नागेंद्र मुतकेकर, प्रदुषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, अशासकीय सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक झाली.