सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९६.०६ टक्के

मार्च महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ६३ हजार २९६ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

त्यापैकी ६२ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. दरम्यान, ६० हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९६.०६ टक्के एवढा लागला आहे. २२ हजार ७२४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ११ हजार ६९५ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

सोलापूर शहर व जिल्ह्यात १ ते २६ मार्च या कालावधीत १८२ केंद्रावर परीक्षेचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील ६२ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. अनेक शाळांचे निकाल १०० टक्के लागला आहे. ९० टक्केहुन अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

विद्यार्थ्यांना छायाप्रत, गुणपडताळणी साठी २८ मे पासून अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी व छायाप्रतिसाठी दि. २८ मे ते ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. तसेच यंदा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये श्रेणी/ गुण सुधार योजनेअंतर्गत परीक्षा देता येणार आहे.