मंगळवेढा रुग्णालयास 99 कोटी 60 लाख रुपयाचा निधी मंजूर……

मंगळवेढा व पंढरपूर मतदारसंघामध्ये ग्रामीण रुग्णालयास निधी मिळावा यासाठी नागराज ज्ञानेश्वर व्हनवटे या सलगरच्या सुपुत्राने 29 सप्टेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते.त्यास आज मूर्त स्वरूप प्राप्त होऊन शासनाने निधी मंजूर केला असल्याची माहिती नागराज व्हनवटे यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा पंढरपूर, सांगोला या तालुक्यात कष्टकरी, कामगार, हातावर पोट असणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कायमच अंगमेहनतीचे काम करणारे हे कामगार वैद्यकीय उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय यात दाखल होऊन उपचार घेतात.

पण काही उपचारांच्या करिता त्यांना सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात पाठवले जाते. मंगळवेढा – पंढरपूर, सांगोला येथील बहुसंख्य रुग्ण हे सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल होतात.सोलापूर जिल्हा ते मंगळवेढा – पंढरपूर, सांगोला हे अंतर खूप लांब आहे त्यामुळे येथील नागरिकांना सोलापूर जिल्हा रुग्णालय येथे जाण्यासाठी खूप त्रास होतो.

मंगळवेढा पंढरपूर येथे सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालय (सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल) उभारण्यात यावे अशी मागणी अनेक दिवसापासून येथील जनतेची मागणी होती.मंगळवेढा येथे तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेऊन शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालयास 99 कोटी 60 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.