माॅन्सूनची वाट पाहणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसांमध्ये माॅन्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.तसेच राज्यात पुढील आज आणि उद्या दिवस काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
माॅन्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने आज खूषखबर दिली. हवामान विभागाने आज स्पष्ट केले की, माॅन्सून पुढील ५ दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होईल. तसेच माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील ५ दिवस माॅन्सून दक्षिण अरबी समुद्र, उर्वरित मालदीव आणि कोमोरीन भाग, लक्षद्वीपचा आणखी काही भाग, केरळ, आग्नेय आणि मध्य बंगालचा उपसागर तसेच ईशान्य भारतातील काही भाग व्यापे, असा अंदाज हवामान विभागाने दिला.हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात पावसाचा आणि उष्णतेच्या लाटेचाही इशारा दिला.
कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आणि नगर तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि नांदेड तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावाती, नागपूर जिल्ह्यात काही ठिाकणी वादळी पावसाचा अंदाज दिला.