शक्तिपीठ मार्गाला या तालुक्यातील लोकांचा विरोध….

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ,उत्तर सोलापूर,सांगोला या तालुक्यांमधून नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची पावले सरकारकडून वेगाने उचलली जात असताना या प्रकल्पाला विरोध वाढत आहे.प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला.

योग्य मोबदला दिला नाही तर या प्रकल्पाला एक इंच सुद्धा जमीन देणार नसल्याचा इशारा सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण यांनी दिला. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा. संग्राम चव्हाण व दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा पार पडला.