आचारसंहितेनंतर आनंदाचा शिधाचे वाटप

महायुतीच्या सरकारकडून विविध जयंती, दिवाळी पाडवा सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढी पाडवा यानिमित्त रेशनकार्डधारकांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात येणार होते. मात्र, लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ‘आनंदाचा शिधा वाटप होऊ शकला नाही. दरम्यान, ४ जूननंतर आचारसंहिता शिथिल होणार आहे. नंतर ‘आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली.

‘आनंदाचा शिधा’ योजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना एकूण आठ प्रकारच्या वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या वस्तूंमध्ये तेल, मीठ, साखर तसेच गहू आणि तांदूळ यांचा समावेश आहे. रेशनकार्डधारकांना सण साजरा करण्यास मदत होते. गरीब कुटुंबांना सणांच्या निमित्ताने या वस्तूंची गरज असते. त्यामुळे राज्य सरकारकडून ‘आनंदाचा शिधा दरवर्षी सणानिमित्त वाटप करण्यात येतो, यंदा लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे शिधा वाटपास अडचण येत आहे.

त्या शिध्यावर पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची छायचित्रे आहेत. तसेच काही धान्य आले आहे, तर काही आले नाही. त्यामुळे ‘आनंदाचा शिधा वाटप झालेला नाही. ४ जूननंतर आचारसंहिता शिथिल होईल. ‘आनंदाचा शिधा वाटप होणार असल्याचे सांगितले.

सोलापूर शहर-जिल्ह्यात ‘आनंदाचा शिधा’ आलेला आहे. मात्र, आचारसंहितेमुळे वाटप होण्यास विलंब होत आहे. शिधा पाकिटावरील पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचे फोटो काढून रेशनकार्डधारकांना शिधा वाटप सुरू आहे. आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्षात वाटपास वेग येईल.