तारदाळ (ता. हातकणंगले) येथील शहीद जवान नीलेश खोत यांच्या वीरपत्नी प्रियांका खोत यांची इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंदपदी निवड झाली आहे. याबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांचा सत्कार केला.
श्रीमती प्रियांका यांच्या माध्यमातून शहीद जवान नीलेश खोत यांची देशसेवा पूर्ण होईल, अशा शब्दात आमदार आवाडे यांनी शुभेच्छा दिल्या. जवान खोत हे देशसेवा बजावत असताना दोन वर्षांपूर्वी शहीद झाले. त्यातून खचून न जाता प्रियांका यांनी नीलेश यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्मी जॉईन करण्याचा निर्धार केला.
त्यानुसार त्यांनी तयारीही सुरू केली आणि ध्येय व चिकाटीच्या बळावर त्यांनी आर्मीमध्ये प्रवेश मिळवला. अवघ्या दीड वर्षात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. या यशाबद्दल आमदार आवाडे यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी कांता खोत, माधुरी खोत, चंद्रकांत चौगुले, यशवंत वाणी, कुमार खोत, राजाराम खोत, रणजित माने, सूर्यकांत जाधव, अमित खोत, विनायक देसाई उपस्थित होते.