आटपाडीत जागेच्या वादावरून विळ्याने हल्ला!

गुन्हेगारी क्षेत्रात भरमसाठ वाढ झालेली आपणाला पहायला मिळतच आहे. अगदी राजरोसपणे एकमेकांवर जीवघेणे हल्ले अलीकडे होत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार आटपाडी तालुक्यात उघडकीस आलेला आहे. बनपुरी (ता. आटपाडी) येथे मुरुमातील दगड टाकण्यास मज्जाव करून दामू संदीपान टोके (वय ६०) यांना मारहाण करून त्यांच्यावर विळ्याने हल्ला करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी अमोल शहाजी टोके, शहाजी साहेबराव टोके, साहेबराव टोके, वनिता शहाजी टोके (सर्व रा. बनपुरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दामू टोके यांनी घराच्या समोरील जागेत विहिरीचा मुरुम आणून टाकला आहे. त्यातील दगड वेचून बाजूला टाकत असताना, अमोल टोके तेथे येऊन आमची जागा आहे, इथे दगड टाकू नको, म्हणून दामू यांना कानाखाली मारले. चुलत भाऊ शहाजी टोके यांनी मारहाण करून त्याच्या हातातील विळीने डोक्यात मारून जखमी केले. दामू यांचे चुलते साहेबराव टोके यांनी येऊन मारहाण केली. त्यावेळी दामू यांची पत्नी भांडणे सोडविण्यासाठी आली असता, तिलाही वनिता शहाजी टोके हिने धक्काबुक्की केली. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगित