मोठी बातमी! आजपासून ‘या’ राज्यात पान मसाल्यासह तंबाखूच्या विक्रीवर बंदी

आजपासून उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) पान मसाल्यासह तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास तुरुंगवासही होऊ शकते असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता उत्तर प्रदेशात पान मसाल्यासोबत तंबाखूचं सेवन आणि विक्री करता येणार नाही. दरम्यान, या नवीन निर्णयाच्या संदर्भात अन्न सुरक्षा आयुक्त अनिता सिंग यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना माहिती पाठवली आहे.

ही बंदी आजपासून (1 जूनपासून) लागू होणार आहे. अन्न सुरक्षा आणि मानके (विक्रीचे प्रतिबंध आणि प्रतिबंध) विनियम, 2011 चे नियमन 2.3.4 अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 अंतर्गत तंबाखू आणि निकोटीनच्या वापरास कोणत्याही अन्नामध्ये घटक म्हणून प्रतिबंधित करते. त्यामुळं आजपासून उत्तर प्रदेश राज्याच्या हद्दीत तंबाखू असलेल्या पान-मसाला/गुटख्याचे उत्पादन/पॅकिंग, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.