इस्लामपूरात अनुदानित व विना अनुदानित काही शिक्षण संस्था पालकांकडून भरमसाट शैक्षणिक फी व अन्य फीची आकारणी करीत असल्याने शासनाकडून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने गटशिक्षण अधिकारी
यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.जिल्हाध्यक्ष गजानन पाटील, डॉ. इस्लामपूर गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देताना गजानन पाटील आदी.भगवान पाटील, संदीप भिलार, माणिक पाटील, विनायक कुटे यांनी निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष २०२४ -२०२५ साठी इ. १ ली ते ११ वीपर्यंतची शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. काही अनुदानित व विनाअनुदानित संस्था व शाळा प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांची आर्थिक लूट करीत आहेत, असे दिसून आलेले आहे. राज्य सरकारने एकीकडे शिक्षकांची पदे रिक्त ठेवायची, दुसरीकडे नवीन शिक्षण धोरणाच्या घोषणा करायच्या, असा
प्रकार सध्या सुरू असल्याचे दिसत आहे. तरी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण शैक्षणिक बाबतीत तातडीने कार्यवाही करून अनुदानित व विनाअनुदानित संस्था व शाळेतील भरमसाट प्रवेश फी व अन्य फी त्वरित थांबवावी.