वाळवा येथे बसस्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य!

वाळवा येथे तासगाव ते इस्लामपूर मार्गावर नऊ ठिकाणी बसथांबा आहेत. मुख्य बसथांबा नेमीनाथनगर, आंबेडकर नाका कोटभाग, हुतात्मा चौक, हुतात्मा किसन अहिर विद्यालय, चांदोली वसाहत, माळीनगर, मोहिते मळा येथे तासगाव ते वाळवा मार्गे इस्लामपूर मार्गावर बसस्थानक आहे. नेमीनाथनगर, हुतात्मा चौक, हुतात्मा बझार, हुतात्मा साखर कारखाना, गणेशनगर हे बसथांबा आहेत.

यापैकी आंबेडकर नाका कोटभाग येथील बसस्थानक हुतात्मा संकुलने बांधले आहे. बसस्थानक परिसरातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचते आणि अपघात घडत आहेत.सांगली मार्गावर मुख्य वाळवा मध्यवर्ती मुख्य बसस्थानक होणे गरजेचे आहे. सध्या सर्वांना निवारा शेडमध्ये बसायला जागा नाही, स्वच्छता नाही.

त्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने सुसज्ज बसस्थानक होणे गरजेचे आहे. वाळवा येथे मुख्य बसस्थानक नाही. राजारामबापू सहकारी साखर कारखाना, जयंत दारिद्र्यनिर्मूलन समितीच्या वतीने नेमीनाथनगर येथे बसस्थानक उभारले आहे. परंतु या बसस्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य आहे.