सांगलीचा ‘वाघ’ कोण?उद्या फैसला

सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाची राज्यभर उत्सुकता आहे. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही तिकीट मिळविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना टोकाचा संघर्ष करावा ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे तुम्ही वाघ असाल, पण आम्ही सांगली जिल्ह्याचे वाघ आहोत, असे विश्वजित कदम यांनी जाहीर व्यासपीठावर ठणकावून सांगितले.

मात्र, लोकसभा निवडणुकीच्या उद्याच्या (दि.४) निकालावरून जिल्ह्याला इस्लामपूरचा, तासगावचा की कडेगावचा वाघ मिळतो, ते ठरणार आहे.प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, विशाल पाटील व जयश्री पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबई, दिल्ली व नागपूर दौरे केले.

तरीही काँग्रेसजनांच्या पदरी उमेदवारी मिळवण्यात निराशाच आली. घटक पक्ष असलेल्या उद्धवसेनेने दुहेरी महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी हट्टाने आणले. मात्र नाराज झालेल्या काँग्रेसच्या सांगलीतील नेते व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत आघाडी च्या त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी विश्वजीत कदम यांच्यावर टीका टिप्पणी केली.

त्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या छुप्या पाठवल्यवर बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी लढवली. विश्वजीत कदम यांनी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात व्यासपीठावर उपस्थिती दाखवली.

त्यावेळी उद्धवजी तुम्ही राज्याचे वाघ आहात पण जिल्ह्याचे वाघ आम्ही आहोत असे कदम यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. त्यानंतर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या विधानाला प्रचारात फोडणी दिली. वाघ झुडपात लपून हल्ला करीत नाही तर समोरून येतो. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तर तुम्हाला आम्ही खरेच वाघ समजू अशी टिप्पणी राऊत यांनी केली. आता नेमका जिल्ह्याचा वाघ कोण होणार हे उद्या नक्कीच कळेल.