येडेनिपाणी स्मशानभूमीची स्वच्छता

पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणची स्वच्छता केली जाते. जेणेकरून घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये. श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान सेवाभावी मंडळातर्फे सन २०१७ पासून येडेनिपाणी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीची प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये स्वच्छता करण्यात येते. शनिवार २ जून रोजी मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळाच्या वतीने वैकुंठधाम स्मशानभूमीची साफसफाई करण्यात आली.

जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव यांनी दिली. या स्वच्छता मोहिमेमध्ये मल्लिकार्जुन सेवा मंडळाचे शिवभक्त दाजी पेटकर, विलास पाटील, मोहन कांबळे, दिलीप पाटील, संभाजी पाटील, दादासो पाटील, देवेंद्र पाटील, कृष्णा पाटील, प्रवीण पाटील, अध्यक्ष गोरखनाथ गुरव उपस्थित होते.