इचलकरंजी महापालिकेने शहरातील २६ वॉर्डातून दररोजचा कचरा गोळा करण्यासाठी ६८ घंटागाड्या व इतर वाहने, अशा ७५ वाहनांचा ठेका आदर्श फॅसिलिटी अँड मॅनेजमेंट सर्व्हिसेसला दिला आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून त्यातील २० घंटागाड्या बंद असल्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी महापालिकेला दिली. परंतु महापालिकेने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे हत्तीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.
त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनामार्फत तपासणी केली. त्यामध्ये पाच घंटागाड्यांना हौदा नसल्याने नादुरुस्त, चार घंटागाड्या राखीव तीन अन्य कारणांविना नादुरुस्त, एक दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये असल्याचे आढळले. त्यामुळे निरीक्षकांनी आठ घंटागाड्या पूर्ण बंद असल्याचा अहवाल दिला.
शहरात फिरून दैनंदिन कचरा गोळा करणाऱ्या २० गाड्या वर्षभर बंद असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाने पाहणी केली. त्यामध्ये आठ गाड्या बंद असल्याचे आढळल्याने ठेकेदार कंपनीला दंडात्मक कारवाई करण्याबाबतची नोटीस बजावली.