लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच निवडणूक निकालानंतर उद्या महाराष्ट्र काँग्रेसची बैठक (Maharashtra Congress Meeting) पार पडणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या बैठकीसाठी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच सांगलीचे विशाल पाटील ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहे. सांगलीच्या जागेवरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील चढाओढ ते विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवून मिळवलेला विजय, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.
Sangli Lok Sabha: महाविकास आघाडीतील विजयी उमेदवार ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर
