सोलापुरात झळकले जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडचे बॅनर…..

मागील अनेक दिवसांपासून बोनी कपूर आणि दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारिया (Shikhar Pahariya) यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच बोनी कपूर यांनी देखील एका मुलाखतीमध्ये त्यांच्या नात्यावर भाष्य करत यावर शिक्कामोर्तबच केलं. त्यामुळे काही महिन्यांपासून शिखर पहाडिया हे नाव बरंच चर्चेत आहे.  पण सध्या हे नवा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलंय.

4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 30 उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळलला. सोलापुरात देखील काँग्रेसच्या उमेदवार आणि सुशीलकुमार शिंदे यांची लेक प्रणिती शिंदे यांनी सोलापूरकरांची मनं जिंकत गड राखला. त्यांनी भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव केला. त्यावर त्यांचा भाचा आणि जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाने खास बॅनर देखील लावलेत. 

शिखरने त्याच्या सोशल मीडियावर प्रणितीसाठी पोस्ट केली आहे. तसेच त्याने यावेळी सोलापूरच्या जनतेचे देखील आभार मानले आहेत. त्याने प्रणिती शिंदे यांचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. शिखरने प्रणिती शिंदेंच्या अभिनंदनासाठी एका बॅनर देखील त्याच्या सोशल मीडियावर टाकलाय. त्यामुळे मावशीच्या विजयाचा भाच्यालाही खूप आनंद झाल्याचं चित्र आहे.