शिराळा तालुक्यातील सागाव येथे वन विभागाने कारवाई करून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली.
त्यांच्याकडून प्रेम उलटीचा नमुना, पाच मोबाईल, दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामागे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.संशयितांनी चार किलोपर्यंत व्हेल माशाची उलटी देऊ, असे सांगितले होते. या उलटीचा एका किलोचा दर १ कोटी रुपयांपर्यंत आहे.
या कारवाईत रोहन सर्जेराव पाटील, प्रथमेश सुरेश मोरे, दिग्विजय उत्तम पाटील, सुखदेव सावळे, दत्तात्रय आनंदराव पाटील यांना अटक केली आहे. न्यायालयासमोर आरोपींना २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. व्हेल माशाची उलटी तस्करी करणारी टोळी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सागाव येथील पेट्रोल पंपावर बनावट ग्राहक बनून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गेले.