खानापूर मतदारसंघात लिफाफ्याला धनुष्यबाणाची साथ!

खानापूर विधानसभा मतदार संघातून विशेषतः आटपाडी तालुक्यातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या लिफाफ्याला शिंदेसेनेच्या धनुष्यबाणाची साथ मिळाल्यानेच त्यांना काही अपवाद वगळता मतदारसंघात मताधिक्य मिळाले.
राजकीय सहानुभूती व मतदारांनी हातात घेतलेली निवडणूक यामुळेच विजय सुखकर झाला.

तर संजय पाटील यांचा खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्याशी झालेला वाद, स्थानिक राजकारणात केलेली ढवळाढवळ एककल्ली कार्यक्रम यामुळेच पराभवाला सामोरे जावे लागले असून, २०१९च्या निवडणुकीत पडळकरांना मिळालेली मते व संजय पाटील यांना मिळालेल्या मतांची बेरजे इतके मताधिक्य मिळविण्यात संजय पाटील अपयशी झाले आहेत.