राज्यातील वातावरणात सातत्यान बदल होतं आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तर काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 5 ते 8 जून दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ते 14 जून दरम्यान राज्यातील सातारा, सांगली, पुणे, कोकण, नगर, नाशिक, मुंबई या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई येथील काही भागात अतिवृष्टी होणार असा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या भागातही या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात आजपासून पावसाला सुरुवात झाली असून 14 जून पर्यंत राज्यात पाऊस सुरू राहणार आहे.
