हातकणंगले येथे पूरपरिस्थितीमध्ये पूराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी येथे आपत्ती व्यवस्थापन न अंतर्गत रबरी बोटीतून आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी हातकणंगले श्री तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे क यांची प्रमुख उपस्थिती होती.निलेवाडी गांव हातकणंगले मी तालुक्यातील पुर परिस्थितीमध्ये बाधीत होणारे गाव आहे.
मागील पुरजन्य परिस्थिती वेळी गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनार्तंगत पूर्व नियोजन करून आपत्ती परिस्थितीत कोणतीही कमतरता राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. हवामान खात्याकडूनही यंदा चांगला पाऊस होणार असल्याची संभाव्य शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन ही आता अॅक्शन मोडमध्ये असल्याचे दिसत आहे