इस्लामपूर बिजनेस फोरमच्या अध्यक्षपदी येथील विकास राजमाने यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी प्रवीण फल्ले व नवाज पटवेकर यांची निवड करण्यात आली आहे. राजारामबापू साखर कारखान्याचे आयबीएफचे संस्थापक प्रतीक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. प्रतीक पाटील, मावळते अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्याहस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष विकास राजमाने व उपाध्यक्ष प्रवीण फल्ले, नवाज पटवेकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी सचिव विश्वजीत पवार, भगतसिंह पाटील, जयदीप पाटील, शहाजी पाटील, वैभव भोसले, मोहन जाधव, राजू देसाई, महेश ओसवाल, स्वरूप साळुंखे, धीरज भोसले, धर्मवीर पाटील आदी सदस्य उपस्थित होते.
Related Posts
इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार कोण ?
इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेमध्ये जाेरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार मुंबईत तळ ठोकून आहेत. तर गौरव नायकवडी यांच्याही मुंबई…
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील 22 गावातील 141 घरकुल प्रस्ताव मंजूर!
महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विशेष पाठपुरव्यामुळे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत…
विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला जयंत पाटील यांचा आरोप!
विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार न झाल्याचा आरोप करत राज्याच्या राजकारणात असे कधीही झाले नव्हते. दोन्ही सभागृह ताब्यात व घेऊ,…