शहाजीबापूंची वाढली धाकधूक……

पंढरपूर तालुक्यातील 57 गावे ही माढा लोकसभा मतदार संघात येतात. त्यातील 42 गावे माढा, तर सांगोला विधानसभेला 15 गावे जोडण्यात आली आहेत. भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार बबनराव शिंदे, विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटील, शरद पवार गटाचे गणेश पाटील, कल्याणराव काळे यांचे माढ्यातील 42 गावांत वर्चस्व आहे.मात्र, याच 42 गावांतून धैर्यशील मोहिते पाटील यांना 16 हजार 500 चे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे बड्या नेत्यांच्या बोलकिल्ल्यातच भाजपला धक्का बसला आहे.

विशेषत अजित पवार गटाकडून निंबाळकरांना ठेंगा दाखवला गेल्याची चर्चा आहे. महायुतीच्या पाच आमदारांसह राष्ट्रवादी काॅंग्रेस नेत्यांची माढा लोकसभा मतदारसंघात मजूबत ताकद होती. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी बाजी मारली आहे. मोहिते पाटलांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा 1 लाख 21 हजार मतांच्या फरकाने धुव्वा उडवला. माढा लोकसभा मतदार संघात पंढरपूर तालुक्यातील 57 गावांचा समावेश आहे.

यापैकी 42 गावे माढा, तर 15 गावे सांगोला विधानसभा मतदार संघाला जोडली आहेत.पंढरपूर तालुक्यातील 52 गावे जी माढा आणि सांगोला विधानसभा मतदार संघाला जोडली होती. त्या गावांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पसंती दिली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आणि शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची धाकधूक वाढली आहे.