लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा होतानाचे चित्र पहायला मिळत आहेत. कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार याचे तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. सध्या विधानसभा उमेदवारी हा चर्चेचा विषय जोर धरू लागला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. विद्यमान आमदार आवाडे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांना डावलून माजी आमदार हाळवणकर यांना उमेदवारी दिली जाणार काय, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. भाजपच्या उमेदवारासाठी आवाडे- हाळवणकर यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.