अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या मंगळवेढा तालुक्यातील निवडी जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या जिल्हा पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या असून जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी याबाबतच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.निवडलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून अजित जगताप तर तालुका अध्यक्ष म्हणून भारत बेदरे शहर अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर भगरे, प्रांतिक सदस्य म्हणून प्रवीण खवतोडे यांना संधी देण्यात आली आहे.

जिल्हा उपाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड यांना तर खजिनदार म्हणून राजेंद्र हजारे यांना संधी देण्यात आली तर जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी शंकर माळी व भारत नागणे व विठ्ठल डोके यांना संधी देण्यात आली.

दरम्यान, तालुका कार्याध्यक्ष म्हणून शिवबाळा शिवगोंडा पाटील यांना संधी देण्यात आले आहे शहर कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक बशीर भगवान यांना संधी देण्यात आली.

सत्ताधारी महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड करत सत्ताधारी गटातील सहभागामुळे राष्ट्रवादीच्या गटाला सत्तेचा वाटा मिळाला. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना अशा परिस्थितीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी व पक्ष संघटना वाढीसाठी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी याबाबतच्या निवडी जाहीर केल्या आहेत झालेल्या सदर पदाधिकारी हे अनुभवी असल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

राज्यातील सत्ता स्थापनेत वाटा मिळूनही पदाधिकारी निवडी लांबणीवर टाकलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हा पदाधिकारी निवडी केला आहेत. जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटलांनी या निवडी जाहीर केले असून मंगळवेढ्यातील बारा जणांना या जिल्ह्यात संधी दिली आहे. यात सर्व माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवकांनाच संधी दिल्याचे दिसून येत आहे.