रेंदाळ ग्रामपंचायतीचे गटारी सफाईकडे दुर्लक्ष…

रेंदाळ ग्रामपंचायतीकडून मान्सून पूर्व खबरदारी म्हणून नाले गटारी सफाईकडे दुर्लक्ष झाल्याने पहिल्या पावसातच तुंबून रस्त्यावर पाणी पसरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत यांच्यामध्ये या गटारी वरुन कलगीतुरा रंगला आहे. अनावश्यक ठिकाणी गटर बांधकाम करुन शेखी मिरवणाऱ्या बांधकाम विभागाने बसस्थानक परिसरातील गटर बांधकाम का केले नाही हा कळीचा मुद्दा आहे.

सातत्याने गटारी तुंबून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं आहे. गावातील बसस्थानक येथून उतरत्या प्रवाहातून गटारीचे सांडपाणी नाल्यात जाते बाजूला शेती आहे. बहुतांश गावभागातून आलेल्या गटारी इचलकरंजी रोडवर सम्राट
अशोक (दलित वस्ती) नगरच्या बाजूला असलेल्या मोठ्या नाल्यात मिसळतात. काही ठिकाणी अतिक्रमणे तर काही ठिकाणी नाल्यात कचरा टाकून नाला छोटा झाला आहे. गटारीही मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या आहेत परिणामी अचानक पाऊस झाल्यास घरांत सांडपाणी जाण्याचा धोका आहे.

तर बसस्थानकावर रस्त्यावर गटारीचे साम्राज्य पसरते यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावेमान्सून पूर्व ओढे नाले काही प्रमाणात खुल्या केल्या असल्या तरी दिवान तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला व रेंदाळ हुपरी रोडवरील नाले खोलवर साफ न करता प्रथमदर्शनी फक्त झाडेझुडपेच बाजूला सारल्याचे दिसून येत आहे. मोडतोड झालेल्या गटर बांधकाम, तुंबलेल्या गटारी उपसा करून प्रवाहीत करणे आवश्यक आहे. बसस्थानकाजवळ दफनभूमीच्या बाजूला व इचलकरंजी रोडला लागून असलेल्या सिध्दार्थ नगरच्या बाजूला नालेसफाई करण्याचीही गरज आहे अन्यथा भविष्यात गटारीचे दुषित पाणी रस्त्यावर साचून आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागेल अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे