उजनी धरणाची पाणीपातळी दोन टक्क्यांनी वाढली…..

भीमा व नीरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे भीमा खोऱ्यातील उजनीवरील १८ धरणांत दमदार पावसाने हजेरी लावली.तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.यामुळे उजनी धरणाचीपाणी पातळी दोन टक्क्यांनी वाढली आहे. १.०१२ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

रविवार दि. ९ रोजी सायंकाळी ६ वाजता धरणात वजा ५७.९१ टक्के पातळी झाली आहे. तर एकूण ३१.०२ टीएमसी पाणीसाठा आहे. उजनीकडे येणाऱ्या दौंड येथील विसर्गास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजता ६ हजार २८६ क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत होता.

दौंड येथील विसर्गाने उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात उजनी धरणाची पाणी पातळी वाढू लागल्याने शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.