हुपरीत मदरसाचे अवैद्य बांधकाम; नगरपरिषदेची नोटीस

हुपरी येथील ग.नं. ८४४/अ/ ९ मधील नपा. मालमत्ता क्रं. ४४८९ मिळकतीवर सुन्नत जमियतच्या वादग्रस्त मदरसा बांधकाम संदर्भात नगरपरिषदेने नोटीस जारी केली आहे. अनुषंगीक कागदपत्रांसह १० डिसेंबर रोजी हजर रहावे अन्यथा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाईल असा मजकूर यामध्ये नमूद केला आहे. यामुळे पुढे काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.