श्री चौंडेश्वरी देवांग कोष्टी ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा

– श्री – श्री चौंडेश्वरी देवांग कोष्टी समाज श्री चीडेश्वरी महिला मंच, नवरात्र उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. श्री शारदीय नवरात्रीची पहिली माळ ही श्री चौंडेश्वरी मातेच्या आरतीने सुरुवात झाली.. दुसऱ्या माळेला फनी गेम्स सर्वांसाठी आयोजित केले गेले. यामध्ये संगीत खुर्ची, लिंबू चमचा असे वेगवेगळे गेम घेण्यात आले.

याचा आनंद सर्व वयातील मुलांनी, महिलांनी व पुरुषांनी घेतला. याची सर्व बक्षीसे श्री राजकुमार दोंडे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तिसरी माळेला महिलांसाठी पाक स्पर्धेच्या स्वरूपात अर्पण करण्यात आली. या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे परीक्षण सौ शुभांगी पतंगे व सौ सुरेखा कुलकर्णी मॅडम यांनी केले. रताळ्यापासून बनवलेले पदार्थ स्पर्धेसाठी विषय होता. याचे बक्षीस अनुक्रमे श्री विवेक दौंडे, भूषण तारळेकर, योगेश रसाळ यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. चौथ्या माळेला महिलांसाठी दांडिया आयोजीत केला होता.

त्यात महिलांनी सहभाग घेवून त्याचा आनंद घेतला. पाचव्या माळेला श्री चांडेश्वरी देवांग कोष्टी समाज यांच्या वतीने माहेरचा आहेर आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. सहाव्या माळेला वैयक्तिक नृत्य स्पर्धा वयोगट पाच ते दहा तसेच वयोगट पण ११ ते १५ वा लहान मुलांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. याचे अनुक्रमे बक्षिसे श्री अनिल लाटणे, श्री गोपाळ चोथे, श्री विलासराव म्हेत्रे यांच्याकडून तसेच श्री अवधूत कुमठेकर यांच्याकडून ही देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अश्विनी कांबळे तसेच परीक्षण सौ माधुरी जाधव आणि मृणाल राऊत यांनी केले.

सातव्या माळेला सर्वासाठी नेत्र तपासणी व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. स्पंदन हॉस्पिटलचे सहकार्याने तसेच श्री डॉ. बावर तसेच सौ प्रीती बाबर, डॉ. जांगळे, डॉ. सागर कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरासाठी डॉक्टर सौ देवकाते यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी महिलांमधील वाढते कॅन्सरचे प्रमाण तसेच होमोग्लोबिन यावर मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचे आभार मंचाच्या अध्यक्षा सौ लता कांबळे यांनी मानले. आठव्या माळेला सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पठण आयोजन केल होते.. नवव्या दिवशी सवांसाठी रांगोळी स्पर्धा विषय पर्यावरण समतोलन असा होता. यामध्ये देखील सर्वांनी सहभाग नोंदवला परीक्षक सौ शितल भिंगे मॅडम व पल्लवी थोरात यांनी केले.

तसेच त्यांचे आभार मंचाच्या उपाध्यक्षा सौ स्नेहा कुमठेकर यांनी मानले. सर्व कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी समाज बांधव तसेच श्री चौंडेश्वरी महिला मंच, नवरात्र उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, संचालिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले. श्री चौडेश्वरी महिला मंचाच्या अध्यक्षा सौ लता कांबळे, उपाध्यक्षा सी स्नेहा कुमठेकर, खजिनदार सी वैशाली लाटणे, सचिव सौ सीमा कांबळे, संचालिका सौ स्वाती तारळेकर, सौ विद्या बाबर, सौ वर्षा लाटणे, सी माधवी लाटणे, सौ रेश्मा दिवटे, सौ मीनाक्षी कांबळे, सौ राणी चोथे, सौ मंगल लाटणे, सौ कुंदा कांबळे, सौ रुपाली कांबळे, सौ सुनीता कुरकुटे, सौ तनुजा दीडे सी अश्विनी कांबळे, सौ वैशाली कांबळे, सौ उमा कांबळे, सौ ज्योती दौंडे, सौ उमा उंटवाले, सौ वर्षा दोंडे. सौ अश्विनी दौंडे या सर्वांनी कार्यक्रम पार पाडण्यात सहभाग घेतला. सर्व स्पर्धांचे बक्षिस वितरण सोहळा. कोजागिरी पौर्णिमे दिवशी श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी गल्ली, सांगोला येथे ठीक सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे.