क्रांतीज्योती महिला पतसंस्थेच्यावतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगोला ( बनकरवाडी) या पतसंस्थेतर्फे रविवार दि. २२/ १०/२०२३ रोजी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त हळदी कुंकू, फराळ, दांडिया, गरबा संगीतखुर्ची, कन्यापूजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम संस्थेच्या चेअरमन सौ. भाग्यश्री रामचंद्र बनकर आणि सल्लागार सौ मनिषा उत्तम बनकर यांनी श्री महालक्ष्मीचे प्रतिमापूजन केले.

यावेळी संस्थेच्या संचालिका श्रीमती निलाबाई नारायण अनंतकवळी, सौ. सुशिला संभाजी बनकर, सौ. दिपाली चंद्रकांत बनकर, सौ. रेश्मा बाळासो बनकर, सौ. उर्मिला दत्तात्तय नवले, सौ. भारती उमाकांत बनकर, सी. तृप्ती सचिन बनकर, सौ. राणी उमेश बनकर, सौ. वैष्णवी साताप्पा शिंदे, सौ. अँड. चतजा विक्रांत बनकर तसेच संस्थेच्या सभासद महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यानंतर संस्थेच्या कायदेशीर सल्लागार अॅड. सौ. चैत्रजा विक्रांत बनकर यांची बहुराज्यीय सहकारी संस्थांचे लवाद म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्यावतीने संस्थेच्या चेअरमन सौ. भाग्यश्री रामचंद्र बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या संचालिका व उपस्थित महिलांच्या हस्ते कुमारिकांचे औक्षण करून त्यांना भेटवस्तू वाटप करून ‘कन्यापूजन करण्यात आले. नंतर दांडीया, गरबा, संगीत खुर्ची, उखाणे असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच सर्वासाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक श्री. रामचंद्र आण्णा बनकर, व्यवस्थापक श्री. गणेश नारायण अनंतकवळी तसेच संस्थेचे कर्मचारी श्री. सोमनाथ माळी, श्री. तुषार बनकर, सौ. शिवानी फुले, कु. पुनम बनकर आदी उपस्थित होते.