राजकीय भूकंप मुंबईत पण हादरे सांगोल्यात !

माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी आयोजित केलेल्या मुंबई येथील स्नेह मेळाव्यात रेकॉर्ड ब्रेक 7 ते 8 हजार सांगोलकर बांधवांनी उपस्थिती लावल्याने या स्नेह मेळाव्याची संपूर्ण सांगोला तालुक्यात एकच चर्चा रंगली आहे. दीपकआबांच्या सांगोला तालुक्यात सुरू असलेल्या गावभेट दौरा, महिला मेळावा तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळत असतानाच मुंबई येथील स्नेह मेळावा सुपरहिट झाल्याने अनेक राजकीय पक्षांनी चांगलेच टेन्शन आले आहे .त्यामुळे राजकीय भूकंप मुंबईत पण हादरे सांगोल्यात अशा आशयाचा पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागल्या आहेत.