इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी श्रीमती पल्लवी पाटील यांनी ११ जून रोजी सायंकाळी पदभार घेतला होता. दिवटे यांनी या बदली विरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्याधिकरण बोर्ड, मुंबई मध्ये धाव घेतली होती. न्यायधिकरणाने दिवटे यांची नियुक्ती कायम ठेवली होती.
आपण पदभार सोडला नाही असे पत्रही दिवटे यांनी नगरविकास विभागला दिले होते. आज दिवटे हे आपल्या ऑफिस मध्ये येण्यापूर्वी पाटील या आयुक्तांच्या खुर्चीवर येऊन बसल्या होत्या. त्यानंतर दिवटे आले, त्यांनी न्याधिकरणाने दिलेला निर्णय सांगितला. पाटील यांनी आपल्याला आदेश मिळाला नसल्याचे सांगितले आणि खुर्चीवरून उठण्यास नकार दिला. न्याधिकरणात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत पाटील यांना बोलण्यास सांगितले मात्र पाटील यांनी आपल्याला आदेश मिळाला नसल्याचे सांगितले. अखेर पाटील यांनी सरकारी वकील क्रांती गायकवाड यांच्या सोबत बोलल्या.
त्या अगोदर दिवटे यांनी बाजूला बसून कामाला सुरुवात केली होती. तसेच व्हीसीला ही अधिकाऱ्यांना घेऊन बैठक चालू केली.दरम्यान पाटील यांचे वकिलांशी बोलणे झाल्यानंतर त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला.
महानगरपालिकेचे आयुक्त पदाच्या खुर्चीवर एकाच वेळी श्रीमती पल्लवी पाटील आणि ओमप्रकाश दिवटे हे दोन आयुक्त बसल्याने प्रशासनाचा गोंधळ उडाला. आयुक्त पाटील यांनी सरकारी वकिलांशी बोलणे झाल्यानंतर त्या परतल्या.मात्र यामुळे खुर्चीचा अजब खेळ पाहण्यास मिळाला. या सर्व प्रकार महापालिकेचे आयुक्त, अधिकारी कर्मचारी यांच्या समोर घडला.