इचलकरंजी मतदारसंघात मतदान केंद्रांची फेररचना

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. निवडणुकीची पूर्वतयारी प्रत्येक संघातून होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी देखील सुरू झालेली आहे. अशातच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्यामुळे या मतदारसंघात 254 वरून 266 मतदान केंद्रे करण्यात आलेली आहेत. हे करत असताना मतदान केंद्र आहे त्याच इमारतीत असणार आहे. सरासरी 1350 पेक्षा अधिक मतदार असलेल्या केंद्रामध्ये हा बदल करण्यात आलेला आहे.