वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप आहे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करीत आहे. तसेच भाजप आहे कधीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचा डाव वेळीच ओळखा, असा सल्ला देखील त्यांनी दिला.
भाजपा व आरएसएस हे जाती जातीमध्ये भांडण लावून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा व ओबीसींमध्ये तर आदिवासींचा कोळ्यांमध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्यात आदिवासी एल्गार परिषदेत केला आहे. युद्धामध्ये ज्याप्रमाणे सैन्य आपापल्या बॉर्डरवर उभ राहते, त्याप्रमाणेच जाती जातीच्या नावावर सीमांवर हे सरकार भांडण लावून उभे करत असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी व संघावर निशाना साधला आहे.
ज्याप्रमाणे पॅलेस्टाईनमध्ये सध्या घमासान युद्ध सुरू आहे. तशाच प्रकारे भारतात देखील घमासान युद्ध येणाऱ्या काळात आरएसएस व भाजप जाती-जातीच्या आरक्षणाच्या नावावर लावण्याची शक्यता आहे, अशी भीती प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केली. त्यामुळे हे घडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी आहे. त्याचबरोबर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा नोटबंदी होईल. त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटांमध्ये त्या कन्व्हर्ट करून घ्याव्यात, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.