बाप्पाने भक्तांचं ऐकलं, पुढच्या वर्षी खरोखर गणपती लवकर येणार, 2025 मध्ये ‘या’ तारखेला….

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.काल अनंत चतुर्दशी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाला निरोप दिला.यामुळे सर्वत्र गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष सर्वत्र पाहायला मिळाला.

सर्वच गणेशभक्त हे ला़डक्या बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर ये अशी साद घालताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का? पुढच्या वर्षी बाप्पा खरोखरच लवकर येणार आहेत. येत्या 2025 या वर्षात गणपतीचं आगमन 11 दिवस आधी होणार आहे.

दिलेल्या माहितीनुसार, येत्या 2025 या वर्षात आपले लाडके गणपती बाप्पा 27 ऑगस्टला विराजमान होणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी बुधवारी 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आहे. तर गौरी-गणपती विसर्जन हे 2 सप्टेंबर 2025 रोजी असणार आहे.