पुणे-बंगळूर महामार्गावरील भुतरामनहट्टीजवळ अपघातात कोल्हापूर येथील १६ विद्यार्थी जखमी झाले आहेत.कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अॅग्रिकल्चर महाविद्यालयातील विद्यार्थी (D. Y. Patil Agriculture College Student) जात असलेल्या बसला मागून एका ट्रकने काल सायंकाळी धडक दिली.
यात विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.काकती पोलिस ठाण्यात (Kakti Police Station) याची नोंद आहे. पोलिसांनी सांगितले, अॅग्रिकल्चर महाविद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक सहलनिमित्त कर्नाटकात आले होते. त्यांनी धारवाड येथील कृषी विद्यापीठाला (Agricultural University) भेट दिली.
तेथून परत जाताना भुतरामनहट्टीजवळ उतरले. याठिकाणी त्यांनी प्राणी संग्रालयाला भेट दिली. येथून कोल्हापूरला जाताना मागून ट्रकने धडक दिली. त्यामुळे बसमधील विद्यार्थी जखमी झाले.बसमध्ये ४० पेक्षा अधिक विद्यार्थी होते. यापैकी १६ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
माहिती मिळाल्यानंतर काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी हलविले.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामनहट्टीजवळ कोल्हापूर येथील डी.वाय.पाटील ॲग्रिकल्चर महाविद्यालयाचे १६ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. बसला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.