शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून शाळाप्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ईडब्ल्यूएस दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलेअर दाखला अशा विविध दाखल्यांची आवश्यकता असते. लोकसभा निवडणुकीमुळे दाखले मिळण्यास विलंब झालेला आहे.
दाखले वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, प्रवेश मिळण्यात अडचणी येऊ नयेत, सर्व प्रकारचे दाखले वेळेत मिळावेत या मागणीचे निवेदन भाजपतर्फे प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना दिले. शिष्टमंडळात शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, उत्तम चव्हाण, राजेश रजपुते, अश्विनी कुबडगे, नीता भोसले, नागुबाई लोंढे, दीपक पाटील, उमाकांत दाभोळे आदी उपस्थित होते.