आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने काही महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या खानापूर खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून येथील मुख्य खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, औषधे ही अत्यल्प दरात देण्याची सोय केली आहे. याचा शेतकरी वर्गाने लाभ घेण्याचे आवाहन राहुल गायकवाड, सचिव शशिकांत जाधव यांनी केले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खानापूर खरेदी-विक्री संघ शाखा आटपाडी सुरू करण्यात आली आहे. या संघाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला लागणारी बियाणे व औषध ही कमी किमतीत उपलब्ध करून दिली जात आहेत, अशी माहिती देण्यातआली आहे .
आटपाडी बाजार समितीत अत्यल्प दरात बियाणे
