केशरी शिधापत्रिका असणाऱ्या कुटुंबास पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण; रेशन दुकानात मिळणार आयुष्यमान विमा कार्ड 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रेशन दुकानांतून पात्र लाभार्थ्यांना कार्ड काढून देण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या वतीने अंत्योदय प्राधान्यक्रम व केशरी शिधापत्रिका असणाऱ्या कुटुंबास प्रती वर्ष पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण वैद्यकीय उपचारासाठी देण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

आयुष्यमान मुफ़्त उपचार भारत योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी करण्याची सुविधा प्रत्येक रेशन दुकानांत करण्यात आली आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावरही या नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना यापुढील काळात आणखीन काही सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी तातडीने या योजनेअंतर्गत कार्ड काढून घ्यावे, असेही आवाहन सरडे यांनी केले आहे. आयुष्यमान आहे. ही योजना सर्वसामान्यांसाठी भारत कार्ड असणाऱ्या कुटुंबातील अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने या योजनेत सदस्यांना राज्यातील शासकीय, खासगी जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांची नोंदणी हॉस्पिटलमध्येही वैद्यकीय उपचार करण्यात यावी, अशा सूचनाही रेशन घेण्याची सुविधा निर्माण करण्यात आली दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.

आयुष्यमान भारत योजनेतील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी रेशन दुकानात मोहीम सुरू करण्यात आली आहे. याशिवाय आरोग्य खात्यातील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आशा वर्कर आदींची टीम गावोगावी प्रत्येकाच्या दारी नोंदणीसाठी येत असल्याची माहितीही संतोष सरडे यांनी दिली.