सिडकोतील अंगणवाडी सेविकेच्या मुलीने केवळ दोन पाण्याच्या बाटल्यावर माउंट एव्हरेस्टवर शिखर सर करत डौलाने तिरंगा फडकविल्याने तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्ष होत आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील चेतना शर्मा नावाची मुलगी सिडकोच्या एका छोट्याशा घरात राहते. आई अंगणवाडी सेविका आहे. वडील निवृत्त रेल्वे डाक सेवक आहेत.
दहा वर्षे लहान असलेला भाऊ मुंबईत फुटबॉल कोच म्हणून कार्यरत आहे. चेतनाला गिर्यारोहणाची प्रचंड आवड होती. तिने जम्मू काश्मीरमध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेंसच्या अंतर्गत जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनिंग व अरुणाचल प्रदेशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोर्थ माउंटेनिंग येथे गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेतले आहे.
जुलैत हा अभ्यासक्रम पूर्ण करून तिने ‘ए’ ग्रेड मिळविली. ५ सप्टेंबरला तीने एव्हरेस्ट शिखराचा प्रवास सुरू केला. तो १४ तारखेला संपला आणि एव्हरेस्टवर डौलाने तिरंगा फडकवला. तिथे जाण्यासाठी तिला तब्बल दहा दिवस लागले. परत येताना तीन दिवस लागले. शिखराचा साडेपाच हजार मीटरचा प्रवास तिने यशस्वी पूर्ण केला.
यास तिला तब्बल एक लाख रुपये खर्च आला. पैकी ९० हजार रुपये तिच्याकडे होते. तर दहा हजार रुपये भावाने मदत केली. पैशांची चणचण असल्यामुळे तीने केवळ दोन पाण्याच्या बाटलीवर हा शिखर गाठला. कारण तेथे एका बाटलीची किंमत पाचशे रुपये आहे. वास्तविक पाहता एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी तब्बल पस्तीस लाख रुपये खर्च येतो. पण तिने यापूर्वी घेतलेले प्रशिक्षण या ठिकाणी कामात आले.
याकरिता तिला इंडो- नेपाळ संस्थेचे मार्गदर्शन लाभले. मिळालेल्या मानधनावर तीने एव्हरेस्ट शिखराला जाण्यासाठी खर्च केला. १३ दिवस चाललेल्या या मोहिमेत हवेचा कमी दाब, कमी ऑक्सिजन, दुर्गम रस्ते, पाण्याची उपलब्धता नसणे आदी अडचणी तिला आल्याचे तिने सांगितले.