राज्यात अवकाळी पाऊस पाठ सोडत नसल्याचं दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने पुणे आणि इतर अनेक विजांच्या कडकडाटासह वादळी पावसासाठी येलो अलर्ट (Maharashtra Weather Forecast) जारी केला आहे.पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता देखील वर्तविली आहे.मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात वादळी (Weather Update) पावसाचा इशारा देण्यात आला आहे.