सांगोला तालुक्यात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला होता. म्हणजेच सांगोल्यात एक भीषण अपघात घडला यामध्ये सहा महिलांचा मृत्यू झाला. चिकमहुद येथील बंडगरवाडी नजीक घडलेल्या अपघातात कटफळ ता.सांगोला येथील सहा महिला मजूर मृत्युमुखी पडल्या होत्या. या घटनेने संपूर्ण सांगोला तालुक्यावर शोककळा पसरली होती.
या घटनेत मयत झालेल्या ६ महिला मजुरांच्या कुटुंबीयांना नेहमीच जनसेवेसाठी तत्पर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कार्यतपस्वी आमदार स्व. काकासाहेब साळुंखे पाटील ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. तर या अपघातात जखमी झालेल्या महिला मजुरांनाही उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली.