टेक्निकल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना टेक्नोफॅब सारख्या स्पर्धा मधून प्रोत्साहन मिळेल असे मत प्रांताधिकारी समाधान – घुटूकडे यांनी मांडले. फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज ने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील टेक्नोफॅब २६२३ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीची जाणिव ठेऊन परिश्रम करावेत व उज्वल यश संपादन करावे पण त्यासाठी महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या टेक्निकल क्विझ सारख्या स्पर्धेत विद्याथ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा जेणेकरून त्यांना अभियांत्रिकी विभागाच्या स्पर्धा परीक्षेचा अंदाज येईल.
संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षणाबरोबरच इतर कल्पक उपक्रम राबविणे गरजेचे आहे, अशा उपक्रमांमधून नवीन कल्पना व नवे शोध जन्माला येतील असा विश्वास व्यक्त केला. उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डायरेक्टर डॉ. डि. एस. बाडकर यांनी या स्पर्धेचा हेतू विशद केला . यावेळी त्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन मुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यातील कल्पनेच्या सादरीकरणाला वाव मिळत असल्याचे सांगितले तसेच सायन्स क्विझ आणि टेक्निकल क्विझ मुळे विविध कंपनीचे कॅम्पस इंटरव्ह्यू देत असताना घेण्यात येणाऱ्या टेक्निकल प्टिट्यूड परीक्षेत फायदा होणार असल्याचे सांगितले.