दत्त जयंती निमित्त वजरे तालुका सांगोला येथील सात जणांच्या गळ्यातील सुमारे ९३ हजार किमतीचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना पोलिसांना पकडले आहे. दागिने चोरणाऱ्या चार चोरट्यांना नाझरे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमर केंगार राहणार चोपडी तालुका सांगोला हे सांगोला नगरपालिकेतकंत्राटी कामगार म्हणून कामात आहेत. हे दत्त जयंती असल्यामुळे श्री समर्थ संजीव महाराज देवस्थान यात्रा करता आई व दोन मुलांना घेऊन ते सकाळी अकरा वाजता गेले.
फुले टाकून मुलांना दर्शन रांगेत जात असताना आपल्या लहान मुलाला खांद्यावर घेऊन नारळ फोडण्यासाठी उभे असताना मुलगा स्वराज हा ओरडल्याने केंगार यांनी मागे पाहिले असता गर्दीतून पुढे एक इसम जात असताना पाहिले. केंगार यांनी आपल्या मुलाला खांद्यावरून खाली घेतले. आपल्या मुलाच्या गळ्यातील बदाम नसल्याचे समजले. केदार यांनी आपल्या दोन मुलांना व आईला गर्दीतून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले. नंतर त्या इसमाचा ते शोध घेऊ लागले.
रांगेत असलेल्या महिलांना पाठीमागे असलेल्या इसमाचा संशय आल्याने त्यानंतर खात्री पटल्याने त्या इसमाला पकडले. त्यानंतर अनेक भाविक तेथे जमा झाले. केंगार यांनी घडलेली हकीकत सांगितली व त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याचवेळी गर्दीत अनेक जणांची चर्चा होऊ लागली. अनेक जणांचे दागिने गायब असल्याचे समजले. अनेक लोकांनी तीन लोकांना मारहाण करत पोलिसां जवळ आणले. पोलिसांनी त्या तिघांनाही ताब्यात घेतले. चौघांनी सुमारे 93 हजार किमतीचे अनेक जणांचे दागिने चोरल्याचे कबूल केले आणि या चौघांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला.