नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही बराच काळ रखडलेल्या सांगोला शहरातील महात्मा फुले चौक ते भोपळे रोड रस्त्याचे डांबरीकरण अखेर करण्यात आले. व्यापारी व नागरिकांच्या सततच्या मागणीमुळे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दोन बैठका घेऊन प्रशासन व ठेकेदार यांच्यात समन्वय साधत कोणत्याही परिस्थितीत हे काम पूर्ण कराच असे सांगितले. यामुळे ठेकेदारास हे काम करणे भाग पडले. त्यामुळॆ व्यापारी बांधवांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
बंदिस्त गटार योजनेच्या ठेकेदाराकडून रस्ता खणून पाइपलाईन टाकल्यानंतर केवळ खडीकरण केले होते. गेल्या महिनाभरापासून या परिसरातील नागरिक, व्यापारी. विध्यार्थी वाहनधारकांना खडतर प्रवासाचा सामना करावा लागत होता. परिसरातील व्यापाऱ्यांनी याबाबत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भेट घेतली. संबधित रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आम. देशमुख यांनी अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत बैठक घेऊन पावसाळा सुरु होण्याअगोदर रस्त्याचे दंबरीकरण करा अशी सक्त सूचना केली होती. आ. देशमुख यांच्या सूचनेनंतर कमला वेग आला आणि नागरिकांच्या मागणीनुसार संपूर्ण रस्ता सुरळीत वाहतुकीसाठी सज्ज करण्यात आला आहे. यामुळे व्यापारी बांधावसंह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला नव्या डांबरीकरणाच्या कामामुळे महात्मा फुले चौक , भोपळे रोड व परिसरातील व्यापारी , नागरिक , विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
